राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
निलगिरी : खरा पंचनामा
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील निलगिरीमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर निलगिरी येथे उतरले. यावेळी निवडणूक आयोगाच्या उड्डाण पथकाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. राहुल गांधी हे केरळमधील त्यांच्या संसदीय मतदारसंघ वायनाड येथे जात होते, जिथे ते सार्वजनिक रॅलींसह अनेक निवडणूक प्रचारात भाग घेण्यापूर्वी हा प्रकार घडला.
राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त, निवडणूक अधिकाऱ्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र व मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी केली, तामिळनाडू आणि केरळ राज्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी चेगावली आहे. राज्यांमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. येथे त्यांचा सामना सीपीआय नेत्या अॅनी राजा आणि भाजपचे उमेदवार सुरेंद्रन यांच्याशी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.