Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाडण्यातही आपला विजय, मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा

पाडण्यातही आपला विजय, मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा



जालना : खरा पंचनामा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. प्रकृती अस्वास्थामुळे जरांगेंवर उपचार सुरु आहेत. पण त्यांनी अॅम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, असं आवाहन केलं. आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असेल असं मनोज जरांगे म्हणाले.

मी सांगितलं होतं कुणालाही मतदान करा, समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. सगेसोयरेच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजाने करावं. जरी आपण उमेदवार दिलेला नाही, पाठिंबाही दिला नाही. पण पाडण्यातही आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. उभाच राहावं किंवा उमेदवार द्यावा असं काही नाही, पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. जर सहा जूनच्या आत आरक्षण दिलं नाही तर देणारे बनू, आपण विधानसभेला मैदानात मी सुद्धा असेन... कारण मराठा, मुस्लिम, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. बारा बलुतेदार दलित बांधव सगळ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण देणारे बनूउगाच काहीही अफवा पसरवल्या जात आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी दोघे सारखेच आहेत हे म्हणण्याचा माझा अर्थ होता, या दोघांनी मिळून आमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, दोघांनी लेकरांचं वाटोळं केलं, असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले, आपला उमेदवार नसल्यामुळे, तुम्ही मतदान कोणालाही करा, पण जे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल त्याला करा. इतक्या ताकदीने विरोधकाला पाडा की कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नसल्या पाहिजेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.