Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गडचिरोलीचा निवडणूक बंदोबस्त टाळण्यासाठी आजारपणाचे खोटे नाटक, पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

गडचिरोलीचा निवडणूक बंदोबस्त टाळण्यासाठी आजारपणाचे खोटे नाटक, पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित



पिंपरी : खरा पंचनामा

लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन पोलीस अंमलदाराने आजारी असल्याचे खोटे कारण सांगितले. यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पिंपरी- चिंचवड अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी बुधवारी (दि.17) यासंदर्भात आदेश दिले आहेत.

भूषण अनिल चिंचोलीकर (नमणूक, मुख्यालय, पिंपरी-चिंचवड) असे निलंबित करण्यात आलेल्या पोली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयीन आदेशानुसार 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 50 कर्मचाऱ्यांची नेमणूकीबाबत आदेश प्राप्त झाले होते.

यामध्ये भूषण चिंचोलीकर यांचाही समावेश होता. दरम्यान, बंदोबस्तासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची 10 एप्रिल रोजी निगडी येथे पोलीस मुख्यालयात हजेरी घेण्यात आली. त्यावेळी भूषण चिंचोलीकर गैरहजर होते. आजारी असल्याचे त्यांनी फोनवरुन मुख्यालयात कळवले. चिंचोलीकर यांच्या आजारपणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काळे यांच्याकडे चौकशी करण्यात आली.

चिंचोलीकर हे जुलाब, उलटी, ताप, पोटदुखीचा त्रास होत असल्याने औषधोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी आले होते, असे डॉ. काळे यांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल होऊन तपासण्या करण्यास सांगितले. परंतु, चिंचोलीकर यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. त्यांना होत त्रास गंभीर नसल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.