Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उटगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय

उटगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय



उमदी : खरा पंचनामा

जत तालुक्यातील उटगी येथील येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला आहे. मात्र महिलेच्या नातेवाईकानी तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. शिवाय तिचा पती महांतेश शिवाप्पा कोळगीरी याच्यावर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. उमदी पोलिस याचा कसून तपास करत आहेत.

चन्नाक्का महांतेश कोळगिरी (वय २०) असे मृत महिलेचे नाव आहे. चन्नाका हिचा पती महांतेश हा व्यसनाधीन आहे. त्याचे पहिले लग्न जत तालुक्यातील सोन्याळ येथील एका महिलेशी झाले होते. तिलाही तो मारहाण करत होता. त्यानंतर दोन्ही कुंटुबात वाद होऊन सोन्याळच्या महिलेने त्याच्यापासुन सोडचिठ्ठी घेतली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी कर्नाटकातील ख्याडगी (ता. इंडी जि. विजयपुर) येथील चन्नाका या महिलेशी त्याचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता.

जत तालुक्यातील पुर्व भागातील एका महिलेशी त्याचे प्रेम संबंध असल्याचा संशय होता. यावरुन शुक्रवारी मध्यरात्री दोघांच्यात वादावादी झाली. त्यानंतर चन्नाकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. परंतू तिचा गळा दाबून खून करून गळफास घेतल्याचे दाखविण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

घटनेनंतर उमदी पोलिसानी घटनास्थळी पंचनामा करून पहाटे जत येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलवला. मुलीचे नातेवाईक येणार असल्याने शवविच्छेदनाचे काम थांबविण्यात आले. सकाळी दहा वाजल्यानंतर मुलीचे नातेवाईक जत ग्रामीण रूग्णालयात आले. नातेवाईकांच्या आरोपानुसार पोलिस तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.