'जयंत पाटील यांना त्यांच्याच पक्षात कुणी विचारत नाही'
नागपूर : खरा पंचनामा
'जयंत पाटील सध्या असंबद्ध आणि मुद्द्याल सोडून बोलत आहेत. त्यांना त्यांच्याच पक्षात कुणी विचारत नसल्यामुळे ते त्यांच्या पक्षात नाराज आहेत. सध्या जयंत पाटील कुठे दिसतायत का बघा? लोकसभेची एवढी मोठी निवडणूक सुरू असताना जयंत पाटील कुठेही दिसत नाहीत.
सगळीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारच दिसत आहेत. जयंत पाटील आहेत कुठे?' असा प्रश्न उपस्थित करत 'समझदार को इशारा काफी है' असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना लगावला. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना जयंत पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात दोन दिवसांपूर्वी शाब्दिक युद्ध सुरू झाले. शुक्रवारी इंदापूर येथील महायुतीच्या सभेत 'बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध पवार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे', असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीस यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.