Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काळ्या काचांवर कारवाई करताना भरधाव वाहनाने वाहतूक पोलिसाला उडवले

काळ्या काचांवर कारवाई करताना भरधाव वाहनाने वाहतूक पोलिसाला उडवले



दिघी : खरा पंचनामा

काळ्या काचांवर कारवाई करत असलेल्या वाहतूक पोलिसाला भरधाव चारचाकी वाहनाने उडवले. यात वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाला. चोली येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

राहुल मोटे (वय ३०), असे गंभीर जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. प्रशांत कदम (वय २०), असे गुन्हा दाखल झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मोटे हे दिघी आळंदी वाहतूक विभागात नियुक्त आहेत. चोली गावातून अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करत होते. तसेच यावेळी काळ्या काचांवर कारवाई सुरू होती.

कारवाई वेळी एक पोलीस उपनिरीक्षक तसेच तीन अंमलदार होते. दरम्यान, दुपारी पावणेबाराच्या सुमारास चऱ्होली गावाकडून एक चारचाकी वाहन भरधाव वेगात आले. या वाहनाला काळ्या काचा होत्या. त्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन दामटले. त्यामुळे पोलिस अंमलदार राहुल मोटे यांनी पुढे होऊन वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी चालकाने भरधाव चारचाकी राहुल मोटे यांच्या अंगावर घातली. यात राहुल गंभीर जखमी झाले. त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.