मिरजेतील सर्व विद्यालये, महाविद्यालयांना संविधानाचे वाटप
न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना, परमशेट्टी ट्रस्टचा डॉ. आंबेडकर जयंतीदिनी उपक्रम
मिरज : खरा पंचनामा
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूल आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज शहरातील सवर् विद्यालये आणि महाविद्यालयांना संविधानाच्या प्रतिंचे सांगलीचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजसाहेब लोंढे यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि परमशट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना संविधान समजण्यासाठी सर्व विद्यालय व महाविद्यालय यांना भारतीय संविधानाची आवृत्ती भेट देण्यात आली.
यावेळी मिरजेतील प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर शिरीष चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे होते. अमृतराव सूर्यवंशी यांनी संविधानाचे महत्त्व हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी उपक्रम घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉक्टर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे अधिकार, मताचे अधिकार आणि त्याचा वापर करणे गरजेचे आहे हे सांगून प्रबोधन केले.
यावेळी शाळेचे चेअरमन चंद्रशेखर चव्हाण, प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण, मुख्याध्यापक श्री. माने, प्रा. भीमराव धुळबुळू, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. विकास पाटील, डॉ. रणजीत चेडगुपक, अजित पोतदार, प्रभात हेटकाळे, बाबासाहेब आळतेकर, अतिश अग्रवाल, आकाश बनसोड, मंदार वसगडेकर, संदीप पितालिया, सतीश माने, प्रकाश भंडारे, संजय कानडे, रमेश पाटील, विवेक शेटे, विवेक शिंदे, राकेश कोळेकर, गीतांजली पाटील, इरफान बारगीर, बाळासाहेब बरगाले, विशाल लिपाणी पाटील यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सूर्यकांत व्हावळ यांनी केले तर आभार श्रीमती जाधव यांनी मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.