Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव कारची जोराची धडक; सहायक पोलिस निरीक्षक जागीच ठार

अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव कारची जोराची धडक; सहायक पोलिस निरीक्षक जागीच ठार



मंगळवेढा : खरा पंचनामा

अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डोक्याला कपिल सोनकांबळे पाठीमागे मार लागल्याने गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस निरीक्षक जागीच ठार झाले. ही घटना काल शनिवारी रात्री ९ च्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमालानजीक घडली.

कपिल विठ्ठल सोनकांबळे (वय ४२, सध्या पंढरपूर, मूळचे नांदेड) असे मृत सहायक पोलिस निरीक्षक यांचे नाव आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती कळताच पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी खासगी रुग्णालयात भेट देऊन अपघाताची चौकशी करून त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.

सांगोला पोलिस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले कपिल सोनकांबळे हे स्वतःच्या बुलेटवरून पंढरपूरला घराकडे निघाले होते. दरम्यान, वाटेत पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमालानजीक अज्ञात वाहनाने सायकलस्वारास धडक दिल्यामुळे वृद्ध इसम जखमी अवस्थेत रोडवर पडला होता.

ही घटना पाहून कपिल सोनकांबळे यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून डोक्याचे हेल्मेट काढले व जखमीला मदत करण्यासाठी जात होते. नेमके त्यावेळी सांगोल्यांकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात त्यांच्या डोक्याला पाठीमागे गंभीर मार लागला.

अपघाताची माहिती कळताच पोलिस नाईक राहुल कोरे, आप्पा पवार, मोहसीन सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना उपचाराकरता सरकारी वाहनाने तत्काळ सांगोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.