"सांगली देता का सांगली!"
"न्यायपत्रानेच काढली काँग्रेसची अन्याय यात्रा!"
मुंबई : खरा पंचनामा
न्यायपत्रानेच काँग्रेसची अन्याय यात्रा काढली असून सांगली देता का सांगली, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा आपल्या 'X' अकाऊंटवर एक कविता पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला.
आशिष शेलार यांनी सांगली, धुळे आणि उत्तर मुंबई लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेसची अन्याय यात्रा निघाली असून सांगली देता ता सांगली अशी त्यांची अवस्था झाल्याचे त्यांनी कवितेत म्हटले आहे. तसेच मुंबईत काँग्रेस न्यायासाठी मातोश्रीसमोर येऊन थांबली असून न्यायपत्रानेच काँग्रेसची अन्याय यात्रा काढली असल्याचेही ते म्हणाले आहेत.
राज्यभर सध्या लोकसभा निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष जोरदार प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. यातच महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी, उत्तर मुंबई या जागांवरून असलेला वाद चव्हाट्यावर आला होता. सांगली लोकसभेची जागा उबाठा गटाकडे गेल्याने काँग्रेस पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मुंबईतही आपल्याला कमी जागा मिळाल्याचे सांगत काँग्रेस नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. याच परिस्थितीवरुन शेलारांनी कवितेतून काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे.
आशिष शेलारांची कविता अशी...
सांगली देता का सांगली..?
धुळ्यात ही नाराजीची ठिणगी पडली
उत्तर मुंबई का गळ्यात मारली ?
मुंबईत काँग्रेस "न्याया"साठी मातोश्री समोर येऊन थांबली..!
काँग्रेसची अवस्था पाहून "न्यायपत्र" आतल्या आत रडलं
स्वतःच स्वतःची पाने फाडत चालू लागलं
मला न्याय देता का न्याय?
मला न्याय देता का न्याय ?
असा टाहो फोडत..
"न्यायपत्रा" नेच काँग्रेसची "अन्याय यात्रा" काढली!
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.