सोरेन अटक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची 'ईडी'ला नोटीस
नवी दिल्ली : खरा पंचनामा
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज (दि.२९ एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. तसेच सोरेन यांच्या अटक प्रकरणी याचिकेवर सुनावणीस सहमती दर्शवत या प्रकरणी ६ मे रोजी पुढील सुनावणी होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
जमीन घोटाळा प्रकरणी 'ईडी'ने हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अटक केली होती. त्यांच्या जामिनावरील याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देण्यास केलेल्या विलंबाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तसेच, मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या अटकेला आव्हान दिले होते. आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांचा खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. सोरेन यांच्या अटक प्रकरणी याचिकेवर सुनावणीस परवानगी देत पुढील सुनावणी ६ मे रोजी होईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.