धुळ्याच्या 'वंचित'च्या उमेदवाराची गोची
सरकारने फेटाळला IPS च्या राजीनाम्याचा अर्ज
मुंबई : खरा पंचनामा
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्ष चांगल्या आणि उच्चशिक्षित उमेदवारांचा शोध घेत आहेत. दरम्यान, २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एका आयपीएस अधिकाऱ्याला धुळ्यातून तिकीट दिली होते.
ही निवडणूक लढवण्यासाठी या अधिकाऱ्याने मुदत पूर्व सेवानिवृत्तीसाठी व्हीआरएसचा अर्ज केला होता. मात्र, कॅटने त्याचा अर्ज फेटाळला होता. या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या या अधिकाऱ्याचा अर्ज न्यायायने फेटाळला असून कॅटचा निर्णय कायम ठेवला आहे.
आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान (वय ४७) असे या अधिकार्याचे नाव आहे. रहमान हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी धुळ्यातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी २०१९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. तसा अर्ज त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाला (CAT) ला दिला होता. मात्र, कॅटने आणि गृहमंत्रालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला होता. या आदेशाविरोधात रहमान यांनी डिसेंबर २०२३ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने कॅटचा निर्णय योग्य ठरवत त्यात कोणतीही चूक नसल्याचे म्हटले आहे.
रेहमान हे आयआयटी-कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या याचिकेवर जलदगतीने प्रक्रिया व्हावी तसेच त्यांना निवडणूक लढवता यावी यासाठी ते आता उच्च न्यायालयात गेले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.