Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार'

'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार'



पुणे : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशासह राज्याभरात मोदींच्या सभा होत आहेत. पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा काल (सोमवारी) पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

यादरम्यान काल (सोमवारी) पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली यावेळी त्यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. मोदी यांच्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना मी पुढच्या सभेत भटकती आत्मा कोण हे मी मोदींना विचारेन असं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर कोणता उद्देश ठेवून ही टीका केली हे देखील मोंदींना विचारेन असं अजित पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदानावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे विधान केलं आहे.

"मी आज जे काही बोलेल ते कोणी व्यक्तीगत आपल्यावर घेऊ नये. काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत राहते. ज्याचं स्वतःचं

काम होत नाही तर ते दुसऱ्यांचं काम देखील बिघडवायला लागतात. आपला महाराष्ट्र देखील अशाच एका अतृप्त आत्मांचा शिकार झाला आहे. आजपासून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या काळात ओढला गेला, त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आपले कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना अजित पवार म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही, यासंदर्भात पुढच्या सभेमध्ये मी तिथे असेन तेव्हा पंतप्रधानांना विचारेन की त्या भटकत्या आत्म्याचे नक्की नाव काय आहे. कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे वक्तव्य केलं हे मी त्यांना विचारेन आणि तुम्हाला सांगेन असंही ते पुढे बोलताना म्हणाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.