कराडला बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्यास अटक
13 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त, कराड तालुका पोलिसांची कारवाई
संभाजी पुरीगोसावी
सातारा : खरा पंचनामा
कराड तालुका पोलीस ठाण्याचा मागील काही दिवसांपूर्वी नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पदभार घेतल्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपल्या सहकाऱ्यासमवेत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घोगाव (ता. कराड) गावच्या हद्दीमध्ये बेकायदेशीरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह कराड तालुका आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई शनिवारी दुपारी दोनच्या सुमारांस करण्यात आली. यामध्ये जवळपास ९ लाख ६४ हजार ९६० रुपये किंमतीची विमल पान मसाल्याची पोती व चार लाख रुपये किंमतीचा अशोक लेलँड छोटा हत्ती असा 13 लाख 64 हजार 960 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
समीर बाबासाहेब मुलाणी (वय३३) रा. लोहाटीनगर मलकापूर ता. कराड) असे गुटखा वाहतूक प्रकरणी ताब्यांत घेतलेल्या संशयितांचे नाव आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ, गुटखा आणि दारूबंदी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सुचना दिल्या आहेत.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, पो. हवा. सतीश जाधव, सज्जन जगताप, विनोद माने, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे, धनंजय कोळी, संदीप पाटील, सुनील माने, नितीन कुचेकर, नाना नारनवर आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.