2 वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री; आता करतायेत मोलमजुरी
सरकारकडून मिळणारे मानधनही बंद
मुंबई : खरा पंचनामा
दुर्मिळ वाद्य 'किन्नेरा' ला पुनरुज्जीवन दिल्याने पद्मश्री मिळालेले दर्शनम मोगुलैया यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच ते हैद्राबादमधील एका बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करताना दिसले.
73 वर्षीय दर्शनम यांना 2022 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मश्री देऊन सन्मानित केलं होतं. शासनाकडून दरमहा मिळणारे 10 हजार रुपये आता मिळत नसल्याचं दर्शनम यांनी सांगितलं.
त्यांच्या आणि मुलाच्या औषधांचा खर्च महिन्याला 7 हजार रुपये आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी किन्नेरा वाजवणंही सोडून दिलं आहे. कर्नाटक सरकारने त्यांना सन्मान म्हणून 1 कोटी रुपये देखील दिले, जे त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी आणि इतर गरजांसाठी खर्च झाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी हैदराबादच्या बाहेर एक प्लॉट खरेदी केला होता. त्यावर घर बांधण्याचे कामही सुरू झाले, मात्र पैशाअभावी हे काम बंद पडलं.
9 मुलांचे वडील दर्शनम यांच्या पत्नीचं 4 वर्षांपूर्वी निधन झालं. दर्शनम म्हणाले- त्यांनी कामासाठी अनेकांशी संपर्क साधला. यावर काही लोकांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. काही लोकांनी त्यांना काही पैसेही दिले. एवढं करूनही त्यांची आर्थिक स्थिती सुधारली नाही.
दर्शनम म्हणाले की, 'माझी आणि माझ्या मुलाची प्रकृती चांगली नसते. मला औषधांसाठी दरमहा 7 हजार रुपये लागतात. यानंतर वैद्यकीय चाचणीचा खर्च वेगळा असतो. सरकारकडून दरमहा मिळणारे 10 हजार रुपये मानधन बंद झाल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली. दर्शनम यांनी याबाबत शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारल्या. सर्वांनी मदत करण्याचे आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात कोणीही मदत केली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.