बीअर बारच्या परवान्यासाठी घेतली 3.25 लाखांची लाच, उत्पादन शुल्कचा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
नागपुर : खरा पंचनामा
नवीन बीअर बारच्या परवान्यासाठी सव्वातीन लाखांची लाच घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग ई विभाग नागपूरच्या निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. रवींद्र लक्ष्मण कोकरे (वय ४९) असे अटक केलेल्या निरीक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणात बडे मासे अडकण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत फ्रेण्ड्स कॉलनीत राहणाऱ्या युवकाने नागपूर एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचे कळमेश्वर परिसरात रेस्टॉरेंट आहे. त्यांना त्याठिकाणी बीअरबारचा परवाना हवा होता. यासाठी तक्रारदार यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केला. पाहणी करुन परवान्याची फाइल अधीक्षकांकडे पाठवण्यासाठी रवींद्र कोकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 4 लाखांची मागणी केली. तडजोडी अंती तीन लाख 25 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीचे अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता निरीक्षक रवींद्र कोकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे चार लाखांची मागणी करुन सव्वातीन लाख रुपये स्वीकारण्याची संमती दिली. त्यानुसार पथकाने धरमपेठेतील चिल्ड्रेन ट्राफिक पार्क परिसरात गुरुवारी रात्री सापळा रचला. कोकरे यांनी लाच घेताच एसीबीच्या पुश् अटक केली. त्यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.