5 हजाराची लाच घेताच समोर एसीबीचं पथक दिसलं; पोलिसाने तोंडात कोंबल्या नोटा, पण...
बीड : खरा पंचनामा
एका प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी हवालदाराने लाच घेतली. चकलांबा पोलीस ठाण्यातील हवालदार मारूती रघुनाथ केदार (वय 34) याने 5 हजार रुपयांची लाच घेतली. मात्र, एसीबीचं पथक त्याला पकडण्यासाठी जात असतानाच त्याने हे पैसे तोंडात टाकले. परंतु, ते गिळण्याआधीच एसीबीच्या पथकाने त्याला पकडलं.
यानंतर त्याचं नाक दाबून तोंड उघडण्यात आलं आणि त्याच्या तोंडातून 5 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हे नोंद आहेत. यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती. तक्रारदार आणि त्याचे चुलते यांच्यात शेतीचा वाद आहे. यात प्रतिबंधक कारवाईत मदत करण्यासाठी ही लाच घेतली होती. मंगळवारी संबंधिताने याबाबत छत्रपती संभाजीनगरच्या पथकाकडे तक्रार केली.
यानंतर पथकाने लाच घेताच केदार याला अटक केली आहे. तक्रारदार हा दिव्यांग असतानाही त्याला वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून मारूती केदार याने त्रास दिल्याचाही आरोप आहे. केदार हा तक्रारदाराला सांगायचा की तुझा जामीन तहसीलदाराकडे करायचा आहे. त्यासाठी पैसे लागतील. त्यांनी जामीन नाकारल्यास जेलमध्ये जावं लागेल, असं धमकी केदार द्यायचा. याच त्रासाला कंटाळून तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. या प्रकरणी आता हलावदारावर कारवाई करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.