भाजपची ४०० पारची घोषणा घटना रद्द करण्यासाठीच : रमेश चेंनिथला
कोल्हापूर : खरा पंचनामा
आम्ही सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना मानतो. मात्र, भाजप ही घटना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची अब की बार ४०० पार ही घोषणा घटना रद्द करण्यासाठीच आहे, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेंनिथला यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.
चेंनिथला म्हणाले, देशभरात भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे त्यामुळे त्यांना 400 जागा कधीच मिळणार नाहीत. शरद पवार यांना भटकता आत्मा म्हणणे पंतप्रधान मोदी यांना शोभते का असा सवाल करत त्यांनी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे पण ही संस्कृती मोडण्याचे काम नरेंद्र मोदी व अमित शहा करत असल्याचा आरोप केला.
चेंनिथला म्हणाले, तीन दिवसात मोदी यांनी पश्चिम महाराष्ट्रात सात सभा घेतल्या याचा अर्थ काय? देशात महागाई वाढली आहे. लोकांना भविष्याची काळजी वाटत आहे. त्यामुळे या निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगले मतदान मिळेल. इंडिया आघाडीला सर्वात जास्त जागा महाराष्ट्रात मिळून देशात इंडिया आघाडीचे सरकार बनेल.
यावेळी आमदार सतेज पाटील, आ जयंत आसगावकर, रामचंद्र दळवी, नामदेव गावंडे, सुर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.