अजितदादांना पूर्वकल्पना देऊन आघाडी सरकार पाडलं
तानाजी सावंत यांच्या दाव्याने खळबळ
धाराशिव : खरा पंचनामा
लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतर सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर एकमेकांवर करत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच प्रचार सभेत बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा विरोधकांना कोलीत मिळणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यापुर्वी दोन महिने आधीच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्य सरकार पडणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील प्रचारसभेवेळी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
यावेळी बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे ठरल्यानंतर मी दोन महिने आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तारखेला सरकार पडणार असल्याची पूर्वकल्पना त्यांना दिली होती. अन त्यानंतर ठरलेल्या तारखेला सरकार पाडले, असल्याचे भर सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले. आरोग्यमंत्री सावंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता ऐन निवडणूक काळात विरोधकांना टीका करण्याची संधी मिळणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.