Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

करीना कपूरच्या अडचणीत वाढ !

करीना कपूरच्या अडचणीत वाढ !



भोपाल : खरा पंचनामा

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. करीनाने तिच्या प्रेग्नेंसीच्या काळात एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाच्या नावावरून करीना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. क्रिटोफिर अँथनी अभिनेत्रींच्या विरोधात याचिका दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

करीनाने प्रेग्नेंसीच्या काळात एक पुस्तक लिहिलं होतं. ज्याचं नाव 'करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल' असं ठेवण्यात आलं. या पुस्तकाच्या टायटल मध्ये 'बायबल' हा शब्द वापरल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे करीना विरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी क्रिटोफिर अँथनी नावाच्या वकिलाने केली आहे. करीना व्यतिरिक्त, अमेझॉन ऑनलाईन शॉपिंग अँड जुगजरनौत बुक्स या पब्लिशरवर एफआयआर दाखल करावा अशी मागणी देखील केली आहे.

या प्रकरणी गुरुवारी (९ मे) रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गुरपाल सिंग अहलुवालिया यांनी करीना कपूर खानला नोटीस बजावली. अॅडव्होकेट अँथनी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत मध्यप्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. मात्र अँथनी यांनी करीनाला नोटीस बजावत सात दिवसात उत्तर मागितले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.