पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; कारणही आलं समोर !
मुंबई : खरा पंचनामा
अखेरच्या टप्प्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांसाठी महायुतीकडून जोरदार ताकद लावली जात आहे. आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांची दिंडोरीत सभा झाल्यानंतर मुंबईत घाटकोपरमध्ये रोड शो झाला.
मात्र, या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले नाहीत. प्रकृती अस्वस्थ्यामुळे अजित पवार आज मुंबईत देवगिरी निवासस्थानी आराम करत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार रॅली होत आहे.
दरम्यान, दिंडोरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. नकली शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार हे निश्चित असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ही नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यावर मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल. हा जो विध्वंस होत आहे तो बाळासाहेबांना सर्वात दुःखी करत असावा. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नाचा चुराडा केला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले आहे, मात्र यावरून नकली शिवसेना सर्वाधिक चिडत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.