Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मालकाकडं बघून कोणी बैल खरेदी करत का...'

'मालकाकडं बघून कोणी बैल खरेदी करत का...'



अहमदनगर : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचारसभा सुरू आहेत. काल महाविकास आघाडीची अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्यासाठी प्रचारसभा झाली. या सभेत दिवंगत नेते आर आर पाटील (आबा) यांचे पुत्र रोहित पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. रोहित पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

"निलेश लंके जर साधा माणूस असता तर नगर दक्षिणमध्ये देशाच्या पंतप्रधानांना सभा घेण्याची का गरज भासली याच उत्तर भाजपाच्या उमेदवाराने देण्याची आवश्यक्ता आहे, असा टोलाही रोहित पाटील यांनी सुजय विखे पाटील यांना लगावला. 'देवेंद्र फडणवीस साहेब भाषणाला उभे राहिले की सांगतात की, इथल्या स्थानिक उमेदवाराकडे बघू नका. पंतप्रधान मोदींना करायचं आहे तुम्ही त्यांच्याकडे बघून मत द्या. आता याचा एकच अर्थ होतो की त्यांचा स्थानिक उमेदवारावर त्यांचा विश्वास नसावा. पाथर्डीला बैलांचा मोठा बाजार भरतो. इथले अनेक लोक बाजारात जात असतील, बैल खरेदी करत असतील, बैल विकत असतील. मालकाकडे बघून बैल खरेदी केला असं एकतरी उदाहरण महाराष्ट्रात आहे का? उद्या आमचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीतून मोदी साहेब इकडे येणार आहेत का?, असा सवाल रोहित पाटील यांनी केला.

रोहित पाटील म्हणाले, मतदानाचे आणखी टप्पे वाढवले असते तर बोधे गावात सुद्धा सभा घ्यायला यांनी मागे पुढे बघितले नसते. एवढी दयनीय परिस्थिती यांच्या पक्षाची झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.