Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'3 लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले'

'3 लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले'



पुणे : खरा पंचनामा

कल्याणीनगर अपघाताप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. ससूनच्या दोन डॉक्टरांनी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार ब्लडचा रिपोर्ट बदलला असल्याचं समोर आलं आहे.

अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे ब्लड गोळा करण्यात आले होते, ते दुसऱ्या व्यक्तीचे होते. तेच ब्लड फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. आरोपीचे ब्लड सॅम्पल ससूनच्या डॉक्टरांनी घेऊन ते डस्टबीनमध्ये फेकले. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून तेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले, असा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केला आहे.

श्रीहरी हरलोर यांनी ब्लड सॅम्पल घेतले आणि रिप्लेस केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. अजय तावरे याला देखील अटक करण्यात आली होती. तावरे याच्या आदेशानेच हरलोर याने काम केले आहे. आम्हाला शंका असल्याने आरोपीचे ब्लड सॅम्पल आम्ही औंधच्या हॉस्पिटलला देखील पाठवले होते, असं आयुक्त कुमार म्हणाले.

औंध येथे पाठवण्यात आलेले ब्लड सॅम्पल हे त्याचेच असल्याचा रिपोर्ट काल आला आहे. आरोपीच्या वडिलांसोबत त्याचे ब्लड सॅम्पल मॅच झाले आहे. पण, ससूनच्या ब्लड सॅम्पसोबत वडिलांचे सॅम्पल मॅच झाले नव्हते. त्यामुळे यात फेरफार झाल्याचं आम्हाला दिसून आलं. त्यामुळे आम्ही दोन डॉक्टरांची अटक केली आहे. ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आले आहेत, असं ते म्हणाले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. शिवाय यात प्रशासनाचे हात कसे वाईट कामात गुंतलेले होते हे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी येरवडा पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्यावर कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. डॉक्टर हरलोर याने ३ लाख रुपये घेऊन रिपोर्ट बदलला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.