कराळे पुन्हा 'आयजी'चा पदभार स्वीकारणार; डॉ शेखर उद्या सेवानिवृत्त होणार
नाशिक : खरा पंचनामा
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर हे शनिवारी (ता. ३१) भारतीय पोलिस सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे, दोन महिन्यांपूर्वी कॅट'च्या आदेशानुसार पदउतार झालेले दत्तात्रय कराळे हे पुन्हा विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी २०२४ ला गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यात, नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांचीही बदली करण्यात आली होती. तर, दत्ता कराळे यांची डॉ शेखर यांच्या जागी बदली केली होती. कराळे यांनी नाशिक परिक्षेत्राची पदभार स्वीकारलाही होता. तर, डॉ शेखर यांनी कॅटमध्ये धाव घेत बदलीविरोधात दावा दाखल केला होता. या दरम्यान, डॉ शेखर यांची पुणे येथील मोटार परिवहन विभागात नियुक्ती केली. डॉ. शेखर यांनी 'कॅट'मध्ये याचिका दाखल करताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी, तसेच मेअखेरीस निवृत्ती असतानाही बदलीचे आदेश दिल्याचे म्हटले होते. ५ मार्च रोजी 'कॅट'ने अंतिम निर्णय देत डॉ. शेखर यांच्या बदलीस स्थगिती दिली, तसेच त्यांची पुन्हा नाशिक परिक्षेत्रात नियुक्तीचे आदेश गृह विभागला दिले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये डॉ. शेखर यांनी २० मार्च रोजी पदभार स्वीकारला होता. मात्र कराळे यांच्या नियुक्तीचे त्यावेळी आदेश झाले नव्हते. यामुळे डॉ. शेखर यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा कराळे यांच्याकडेच नाशिकची सूत्रे जाण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.