विखे-पाटील पितापुत्र गुप्तपणे दिल्लीत मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक गौप्यस्फोट
अहमदनगर : खरा पंचनामा
राज्यातील लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढतीपैकी एक असणाऱ्या अहमदनगर मतदारसंघ गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटाने निलेश लंके यांना मैदानात उतरवून भाजपसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.
या मतदारसंघात शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे यांच्याविषयी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. या दोघांनीही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची अलीकडेच भेट घेतली. यावरुन विखे-पाटील पितापुत्र पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी या सभेत वंचित आघाडीवर टीका करणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब थोरात यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे. भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे पाटील हे 28 मे 2023 रोजी रात्री साडेअकरा वाजता तुघलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून आले. ही घटना बाळासाहेब थोरात यांच्यासाठी चांगली आहे, असे मी मानत नाही. दुसरी बाळासाहेबांसाठी धोक्याची घंटा असणारी घटना म्हणजे ९ जून 2023 रोजी दुपारी तीन वाजता खरगे हे सोलापूरहून बंगलोरला गेले. तत्पूर्वी 8 जून 2023 रोजी राधाकृष्ण विखे- पाटील खरगेंना गुप्तपणे भेटले होते. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे मी सांगत नाही. पण भाजपची माणसं काँग्रेसला जाऊन भेटत आहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.