असा जावई नको गं बाई!
सासूसोबतच्या भांडणाच्या रागातून सोसायटीतील १५ गाड्या जाळल्या
पुणे : खरा पंचनामा
सासूबरोबर कौटुंबिक वाद झाल्यावर जावयाने सासूच्या दुचाकीसह सोसायटतील तब्बल १५ दुचाकी जाळल्या. सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. पार्किंग शेजारीच वीजेचे मीटर होते. त्याला झळ बसली असती तर पुर्ण इमारत नेस्तनाबूत झाली असती. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात वाहने जाळणाऱ्या जावयाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना वडगाव बुद्रुक येथील ज्ञानगंगा सोसायटी जवळील महापालिकेच्या इमारतीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, एका ज्येष्ठ महिलेचा जावई उत्तमनगर येथे रहातो. तो सध्या काहीही कामधंदे करत नाही. मात्र पत्नीला नेहमी त्रास देऊन भांडणे करत असतो. त्यांच्या भांडणामध्ये सासूने स्वतःच्या मुलीची बाजू घेऊन जावयाला सुनावले होते. याचा राग जावयाच्या मनात होता. यातूनच जावयाने मंगळवारी रात्री सासूचे घर गाठले. तीथे तीच्याशी वाद घातला. दोघांची भांडणे झाल्यावर जावयाने इमारतीच्या पार्किंगमध्ये आले. त्याने सासूच्या स्कुटरला पेट्रोल ओतून पेटवून दिले.
यामध्ये सासूच्या स्कुटरसह इतर १४ दुचाकीही जळून खाक झाल्या. वाहनांचे सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. यावेळी सोसायटीमध्ये रहात असलेल्या नागरिकांची मोठी धावपळ झाली. त्यांनी स्वतःचा जीव कसाबसा वाचवला. या घटनेची खबर अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निमन दलाचे अधिकारी प्रभाकर उम्राटकर यांनी गांभीर्य लक्षात घेऊन जवानांच्या मदतीने दोन पाण्याच्या लाईन एकाच वेळी तयार करुन पाण्याचा मारा केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.