पोलीस भरतीसाठी चक्क डॉक्टरही उमेदवार!
अभियंते, वकील, एमबीए पदवीधर का नाही बनणार पोलीस
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरु झाली होती. 15 एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले.
मग या भरतीसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांचे अर्ज आले आहे. 17 हजार 471 पदांसाठी 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. परंतु त्यात डॉक्टरही आहेत. इंजिनिअर अन् एमबीए म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतलेले आहेत. वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षितांनाही सरकारी नोकरी हवी आहे. उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पोलीस भरतीसाठी अर्जाची संख्या आणि उच्च शिक्षित उमेदवार पाहिल्यावर बेरोजगारीचे वास्तव्य समोर येत आहे.
राज्यातील पोलीस दलात जेल वॉर्डन, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल, बँड्समन आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी 29 फेब्रुवारी 2024 रोजी जाहिरात काढण्यात आली. पोलीस भरतीसाठी बारावी उतीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. 15 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. या अर्जाची छननी झाल्यावर डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्याला सरकारी नोकरीचे आकर्षण हे कारण असले तरी बेरोजगारीही कारण आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.