घरफोड्या करणाऱ्या रेकॉर्डवरील चोरट्यास अटक
५२ हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरात घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
दीपक संगीता गंगाप्पा आवळे (वय २१, रा. गुलाब कॉलनी, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेले घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी एक विशेष पथक तयार केले होते. हे पथक घरफोडी, चोरीतील संशयितांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकाला एक तरूण धामणी रस्त्यावरून निघाल्याचे दिसून आले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये दागिने आढळून आले. दागिन्यांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने राजमती शाळेच्या पिछाडीस असणारे बंद घर फोडून तेथून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडील दागिने जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने अनिल ऐनापुरे, इम्रान मुल्ला, रोहन घस्ते, सूरज थोरात, श्रीधर बागडी, अजय पाटील, विवेक साळुंखे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.