उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील उत्तर मुंबई मतदारसंघातील निवडणूक सर्वांचे लक्ष वेधणारी आहे. येथे मोदी-शहा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल हे भाजपाचे उमेदवार आहेत.
त्यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांच्याशी होत आहे. भाजपाचा हा बालेकिल्ला असला तरी सध्या प्रचारातील भूमिपूत्र विरुद्ध उपरा, मराठी-अमराठी हे मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे दिसत आहे.
या मतदारसंघात मागच्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली होती. येथे गोपाळ शेट्टी हे ४,६५,२४७ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र, यावेळी भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे मागच्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक ठरलेले मताधिक्य राखण्याचे देखील मोठे आव्हान गोयल यांना असणार आहे.
काँग्रेसचे भूषण पाटील यांचा राजकारणात दबदबा नसला तरी ते बोरीवलीतील स्थानिक उमेदवार आहेत. तर पियूष गोयल हे आयात उमेदवार आहेत. नेमका हाच मुद्दा भूषण पाटील यांना उचलून धरला आहे. त्यामुळे गोयल यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. गोयल येथून प्रथमच निवडणूक लढवत आहेत, त्यांना मतदारसंघातील प्रश्नांची माहिती नाही, त्यांचा या मतदारसंघाशी काहीही संबंध नाही, असा प्रचार भूषण पाटील करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.