Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला पोलिसला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; फरार पोलीसाला अटक

महिला पोलिसला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; फरार पोलीसाला अटक



पुणे : खरा पंचनामा

लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येऊन पोलीस शिपायाने कोल्ड्रींकमधून महिला पोलीस कर्मचाऱ्याला गुंगीकारक औषध दिले. महिला पोलीस कर्मचारी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केले. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून पीडित महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा झाल्यापासून आरोपी फरार होता. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याप्रकरणी खडक पोलिसांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलीस दीपक सिताराम मोघे या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दखल केला आहे. याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला.

आरोपी दीपक मोघे अटक टाळण्यासाठी फरार झाला होता. त्याच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याची दखल घऊन त्याला पोलीस दलातून निलंबित केले होते. आरोपीने सत्र न्यायालय, उच्च न्यायालय येथे वेळोवेळी जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, खडक पोलिसांनी आरोपीच्या विरोधातील पुरावे न्यायालयात सादर करुन त्याच्या जामिनाला विरोध केल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपी सापडत नसल्याने न्यायालयाने आरोपीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.