Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपच्या उमेदवाराने मतदानकार्ड तपासण्यासाठी मुस्लीम महिलांना बुरखा हटवण्यास सांगितले; गुन्हा दाखल

भाजपच्या उमेदवाराने मतदानकार्ड तपासण्यासाठी मुस्लीम महिलांना बुरखा हटवण्यास सांगितले; गुन्हा दाखल



हैदराबाद : खरा पंचनामा

हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बुरखा घातलेल्या मुस्लीम महिला मतदारांना त्यांचे मतदानकार्ड मागून त्यांचे चेहरे तपासल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यासंदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलकपेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. लता यांच्या विरोधात आयपीसीच्या 171C, 186, 505 (1) (c) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता यांनी आझमपूर येथील बुथवर मतदारांचे मतदानकार्ड तपासले. सदर घटनेप्रकरणी व्हिडिओ समोर आल्यानंतर लता यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

विद्यालयात जाऊन मतदान केलं. त्यानंतर त्या अझमपूर येथील पोलिंग बुथवर गेल्या, त्याठिकाणी त्यांनी मतदारांची तपासणी केली आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, त्या गंभीरपणे मतदारांची तपासणी करत आहेत. बुरखा घालून मतदानासाठी आलेल्या काही महिला देखील त्याठिकाणी होत्या. लता यांनी त्यांना बुरखा हटवायला सांगून त्यांचे चेहरे आणि मतदारकार्डावरील फोटो एकच आहेत का, हे तपासलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.