राज्यसभेची निवडणूक या तारखेला होणार
अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्याला उमेदवारी
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीला लोकसभेत कमी जागा का मिळाल्या? राज्यसभेचे जागा मिळणार का नाही याबाबत भूमिका स्पष्ट केलीय. राज्यसभेची जागा सातारा जिल्ह्याला मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज्यसभेसाठी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झालीय.
मेळाव्यात बोलतांना छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणीला दुजोरा दिला. मागच्या लोकसभेच्यावेळी ४१ जागा भाजप युतीच्या होत्या, तर विरोधक ७ जागेवर होते. त्यामुळं आपल्याला यंदा जागा कमी मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला साताऱ्यासाठी राज्यसभेची जागा मिळणार असल्याने इतरांनी मागणी करून नये, असं अजित पवार मेळाव्यात बोलतांना म्हणाले. लोकसभेत साताऱ्याची जागा भाजपला गेल्याने राज्यसभा खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांची रिक्त होणार आहे. त्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्यात येणार आहे.
दरम्यान आज झालेल्या बैठकीत अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे लोकसभा जागा वाटपावेळी ठरलेल्या फॉर्मुल्यावर शिक्कमोर्तब झालंय. तर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या राज्यसभेचा राजीनामा दिलाय. त्याच्या बदल्यात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्याला संधी मिळणार आहे. दरम्यान राज्यसभेसाठी पाठवण्यात येणार उमेदवार हा सातारा जिल्ह्यातील असणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.