एकाचवेळी तहसिलदार, नायब तहसिलदाराला अटक
गोंदिया : खरा पंचनामा
गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. ताब्यात असलेलं वाळूचं टिप्पर सोडवण्यासाठी एक लाखांची लाच घेताना तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ताब्यात असलेलं वाळूचं टिप्पर सोडवण्यासाठी एक लाखांची लाच घेताना गोरेगावचे तहसिलदार किसन भदाणे यांच्यासह नायब तहसिलदार ज्ञानेश्वर नागपुरे आणि राजेंद्र गणवीर यांना लाचलुचपत प्रतिबंधकक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. अवैध वाळू वाहतूक प्रकरणात कारवाई टाळण्याकरता लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंततर सदर वाळू व्यवसायिकानं याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली.
मिळालेल्या माहितीनुसार लाचलुचपत विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तहसिलदार किसन भदाणे, नायब तहसिलदार नागपूरे, राजेंद्र गणवीर यांना अटक करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्वात मोठी कारवाई आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईमुळे पुन्हा एकदा वाळू माफिया आणि महसूल विभाग यांच्यातील हितसंबंध उघड झाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.