भर रस्त्यात उत्तर महाराष्ट्र केसरीची हत्या; दिवसाढवळ्या गोळीबार
नाशिक : खरा पंचनामा
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिक जवळ उत्तर महाराष्ट्र केसरीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ भूषण लहामागेची हत्या करण्यात आली आहे. गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामगेवर गोळ्या झाडल्या आहेत. नाशिक-मुंबई महामार्गावर भर दिवसा हत्येचा थरार पाहायाला मिळाला आहे. पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भूषण लहामागेची हत्या करून आरोपी पसार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. गोळीबारासोबतच भूषण लहामागेवर कोयत्यानेही वार करण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.