मुसेवाला हत्या प्रकरणातील मास्टरमाईड गोल्डी ब्रारचा अमेरिकेत खून
वाशिंग्टन : खरा पंचनामा
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी (मास्टरमाईड) गँगस्टर गोल्डी ब्रार याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. डल्ला-लखबीर टोळीने गोल्डीच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. एका अमेरिकन वृत्तवाहिनीने दावा केला आहे की, गोल्डी ब्रार याची अमेरिकेतील फेअरमॉन्ट आणि हॉल्ट एव्हेन्यू येथे मंगळवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
पंजाबमधील मुक्तसर साहिब जिल्ह्यात 1994 मध्ये जन्म झालेल्या गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदरजीत सिंग होते. त्याचे वडील पंजाब पोलिसातून निवृत्त उपनिरीक्षक आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर त्याचे नाव मीडियात चर्चेत आहे. त्याच्या नावार अनेक गुन्हे दाखल होते. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला.
पंजाब युनिव्हर्सिटी (PU) चे विद्यार्थी नेते गुरलाल ब्रार यांची 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री चंदीगडमधील औद्योगिक क्षेत्र फेज-1 येथे असलेल्या क्लबबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोल्डी ब्रार याचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई याचा निकटवर्ती होता. गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर लॉरेन्स गँगने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, "आता नवे युद्ध सुरू झाले आहे, रस्त्यावर रक्त आटणार नाही."
दरम्यान, गोल्डी ब्रार स्टडी व्हिसावर कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेला होता. कॅनडातूनच गोल्डीने खुनाचा कट रचायला सुरुवात केली. त्याच्या गुंडांनी अनेक हत्या घडवून आणल्या. 18 फेब्रुवारी 2021 रोजी पंजाबमधील फरीदकोट येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.