Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी?

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी?



बारामती : खरा पंचनामा

बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. काटेवाडीतील मतदानानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या.

यावेळी अजितदादांच्या आईचे आशिर्वाद घेण्यासाठी गेल्याचे सुळे यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे यावेळी अजित पवार देखील घरी उपस्थित होते. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय दडलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आज बारामती मतदारसंघात मतदान पार पडत आहे. या लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत आहे. हे दोन्ही गट प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करत होते.

आज सकाळी पवार कुटुंबातील सदस्यांनी विविध मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व राजकीय धामधूम सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी गेल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी ५ मिनिटे अजित पवार यांच्या आईची भेट घेतली. आशाकाकी यांना नमस्कार करायला मी आले होते. आशाताई मतदान करायला आल्या होत्या. त्यामुळे त्यांना भेटले. मी नेहमीच आशिर्वाद घेण्यासाठी येत असते. हे माझ्या काका काकींचे घर आहे. माझं सगळं लहानपण इथं गेलय. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मी इथं राहायचे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.