सांगलीतील तासगावात पाणीप्रश्न पेटला!
आंदोलकाना ताब्यात घेतले, रोहित पाटील यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटला आहे. तासगाव तालुक्यातल्या बिरणवाडी फाटा या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केलं. दरम्यान, पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित आरआर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. परिणामी परिस्थिती चिघळण्याची चिन्ह निर्माण झालं आहे.
पाण्यासाठी बिरणवाडी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्याकडून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित पाटील यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा ही भूमिका घेऊन रोहित पाटील पोलीस ठाण्यामध्येच ठाण मांडून आहेत. सावळजसह परिसरातील शेतकऱ्यांनी पुणदी सिंचन योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी केलं रस्ता रोको आंदोलन होतं. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोहित पाटील थेट पोलीस ठाण्यात आले.
तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरामध्ये ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतुन पाणी मिळावं; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र पाटबंधारे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलन करणारे शेतकरी आणि पोलिसांमध्ये वादावादीचा आणि झटपटीचा प्रकार देखील घडला आहे. शेतकरी संतप्त असल्याने आपल्या आंदोलनावर ठाम होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.