"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे एकाच पक्षाचे दोन गट निर्माण झाले. शिवसेनेत आधी एकनाथ शिंदे नंतर राष्ट्रवादीत अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिला. यावेळी अनेक टिका देखील झाली. ज्या भाजपने अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले. त्यांना सोबत घेतल्याने भाजपचा स्वाभीमानी वर्ग नाराज होता. दरम्यान या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार, सुनील तटकरे व अन्य नेत्यांवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप चुकीचे नव्हते. विदर्भ-कोकण सिंचन महामंडळ व अन्य काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. तर काही जणांवर आरोपपत्र देखील दाखल झाले होते. सिंचनाबाबत कंत्राटे देताना अटी आणि नियम बदलण्यात आले होते. या खात्याचे अजित पवार प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्यावर आरोप केले होते.

सिंचन घोटाळ्याचे २०१० व २०१४ ला मी आरोप केल्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी केली. तेव्हा या घोटाळ्यात अजित पवार यांचा हात असल्याचे तपास यंत्रणांना दिसून आले नाही. प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत देखील तपासात काही दिसलं नाही. तपास यंत्रणांवर आपल्याला विश्वास ठेवायला हवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.