Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पशुधन विकास अधिकाऱ्याने केली, बँक अधिकारी पत्नीची हत्या आधी डोक्यावर वार अन् नंतर मृतदेह फासावर लटकावला

पशुधन विकास अधिकाऱ्याने केली, बँक अधिकारी पत्नीची हत्या
आधी डोक्यावर वार अन् नंतर मृतदेह फासावर लटकावला



संभाजी पुरीगोसावी 
अमरावती : खरा पंचनामा

पती-पत्नी ही दोन चाके म्हणजे संसाराचा गाडा असतो. अमरावती शहरांत उच्च शिक्षित असणाऱ्या पतीने बँकेत असणाऱ्या पत्नीवर चारित्र्यांच्या संशयावरून पतीने बँकेत असणाऱ्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती मधून समोर आली आहे. अमरावतीच्या अर्जुननगर येथील स्नेहा कॉलनीत घडलेल्या या घटनेने शहरांत खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

चारित्र्यावर संशय घेत बँक अधिकारी पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या अर्जुननगर येथील स्नेहा कॉलनीत घडली आहे . यामध्ये दीप्ती चेतन सोळंके (वय ३५) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. या धक्कादायक घटनेने अमरावती जिल्हा हादरून गेला आहे, पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन दीप्ती चेतन सोळंके ही दयापुर येथील स्टेट बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होती. तर पती चेतन सोळंके हा पशुसंवर्धन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होता. पती चेतनला आपल्या पत्नीचा नेहमीच चारित्र्यांचा संशय येत होता. या दोघांमध्ये सतत वाद निर्माण व्हायचे, आणि याच संशयातून पती चेतनने सोळंके याने पत्नीची लोखंडी वस्तूने डोक्यांत वार करीत पत्नीची हत्या केली. त्यानंतर पत्नीने गळफास लावत आत्महत्या केल्याचा बनावही रचला, मात्र शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे खरे कारण समोर आले आणि नराधाम पतीसह सासऱ्यांचा डाव फसला, या प्रकरणी मृत महिलेचा पती सासू व सासर्‍याला गाडगेनगर पोलीसांनी अटक केली आहे. 

या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. चारित्र्यांच्या संशयातून उच्च शिक्षित पत्नीने पत्नीची हत्या केल्याने या घटनेने अमरावती शहर हादरून गेले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.