'मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार'
अटकेतील डॉ. अजय तावरेचा इशारा
पुणे : खरा पंचनामा
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री पोलिसांनी तावरे अन् श्रीहरी यांची कसून चौकशी सुरु केली आहे. पोलीस चौकशीदरम्यान तावरेनं मोठं वक्तव्य केलेय. कारवाईदरम्यान डॉ. अजय तावरे यांनी पोलिसांना सांगितले की, 'मी शांत बसणार नाही. मी सर्वांची नावे घेईन' असा इशारा दिला आहे.
डॉ. अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत. त्यांच्या फोनकॉलनंतरच आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचं तपासात समोर आलेय. पोलीस चौकशीदरम्यान अजय तावरे यांनी मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, असा गर्भित इशाराच दिलाय. तावरेच्या या इशाऱ्यानंतर पुण्यातील वातावरण तापलेय. डॉ. तावरे कोणाची नावे घेणार याकडे लक्ष लागले आहे. तावरेनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अतुल घटककांबळे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
त्याशिवाय त्यानेच या डॉक्टरला पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. त्यांनी या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचेही नाव घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.
कल्याणीनगर कार दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शीना 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन थेट रक्ताचे नमुने बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.