पोलीस कार्यालयात घुसून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, संगणकाची तोडफोड
पुणे : खरा पंचनामा
पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खेड शिवापूर पोलीस दूरक्षेत्र कार्यालयात एका पोलीस हवालदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शिवीगाळ करत एकाने पोलीस कार्यालयात घुसून पोलीस अंमलदाराला खुर्ची फेकून मारुन गंभीर जखमी केले. तसेच कार्यालयाची तोडफोड करुन 50 हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि.15 रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमरास घडली.
पोलीस हवालदार राहुल बाळकृष्ण कोल्है (वय 39) यांनी याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन गौतम साळवे (रा. कल्याण, ता. हवेली, जि. पुणे) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस हवालदार राहुल कोल्हे हे पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर दूरक्षेत्र हवेली तालुक्यातील श्रीरामनगर येथे नेणुकीस आहेत.
रविवारी रात्री कोल्हे हे कर्तव्यावर हजर होते. रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहन काहीही कारण नसताना कार्यालयात आला. रोहन याने कोल्हे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कार्यालयातील खुर्ची संगणकावर मारली. आरोपीने संगणक आणि इतर सरकारी मालमत्तेची तोडफोड करुन 50 हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर रोहन याने कोल्हे यांना खुर्ची फेकून मारत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये कोल्हे जखमी झाले आहेत. राजगड पोलिसांनी रोहन याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.