Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉ. पल्लवी सापळे ससूनमध्ये दाखल ब्लड सॅम्पल प्रकरणी एसआयटी नियुक्त

डॉ. पल्लवी सापळे ससूनमध्ये दाखल
ब्लड सॅम्पल प्रकरणी एसआयटी नियुक्त



पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवीयन आरोपीच्या सुरक्षित सुटकेसाठी कोणी आणि कसे प्रयत्न केले हे आता उघड होऊ लागले आहे. या प्रकरणी अल्पयीन आरोपी वेदांत अग्रवालच्या ब्लड सॅम्पल प्रकरणी ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे.

ब्लड सॅम्पल प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावर राज्य सरकारने एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. 

ससून हॉस्पिटल ब्लड सॅम्पल प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी जे. जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच डॉ. गजानन चौहान आणि डॉ. चौधरी या समितीचे सदस्य आहेत. डॉ. पल्लवी सापळे या पुण्यात दाखल झाल्या आहेत. ब्लड सॅम्पल प्रकरणी नेमके काय झाले, त्या घटनाक्रमाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा डॉ. पल्लवी सापळेंना विचारण्यात आले की, तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. विरोधी पक्षाकडून तुमच्या नेतृत्वातील समितीला आक्षेप घेतला जात आहे. त्यावर डॉ. सापळे म्हणाल्या माझी नियुक्ती वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे. यासंबंधी तुम्ही त्यांनाच विचारा. आमची समिती सर्व संबंधितांची चौकशी करणार आहे. अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले, त्या दिवसाचा घटनाक्रम कसा होता याची आम्ही चौकशी करणार आहोत.

डॉ. पल्लवी सापळे यांची एसआयटी अध्यक्षपदी झालेली निवड ही वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडून झाली आहे. त्यात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप नाही, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.