मंत्र्यांच्या बंगल्याची बत्ती गुल; अर्धा तास मंत्री अंधारात
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात उन्हाचा पारा वाढत आहे. त्यातच राज्यावर लोडशेडिंगचंही संकट आहे. ग्रामीण भाग या दोन्ही समस्यांशी लढत आहे. मात्र, शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या उद्योग- व्यवसायांमुळे लाइट जाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत नाही.
मात्र, आज राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ते ही राज्याचा गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयाला आणि मंत्र्यांच्या बंगल्यातच बत्ती गुल झाल्याचं यला मिळालं. मंत्र्यांच्या बंगल्यात तासाभरापासून लाइटच नसल्यानं मंत्रिमहोदय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा खंडित झाला. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे नेहमी वातानुकूलीत घरांमध्ये राहणाऱ्या मंत्र्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना घामाघूम व्हावे लागले.
तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यावर त्वरित बेस्ट इलेक्ट्रिसिटी विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू कोला. परंतु अर्ध्यातासापेक्षा जास्त काळ वीज पुरवठा खंडित होता.
अजित पवार, अदिती तटकरे, शंभूराज देसाई यांच्यासह इतर मंत्र्यांच्या निवासस्थानी वीज पुरवठा खंडित झाला होता. शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे बंगल्यातील वातानुकूलित यंत्रणेसह सर्वच कामकाज ठप्प झालं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.