Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोट्यवधींच्या पोर्शे कारच्या नोंदणीसाठी बिल्डरकडे १७५८ रुपये नव्हते?

कोट्यवधींच्या पोर्शे कारच्या नोंदणीसाठी बिल्डरकडे १७५८ रुपये नव्हते?



पुणे : खरा पंचनामा

कल्याणीनगर 'हिट अँड रन' प्रकरणात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून मध्यरात्री दुचाकीस्वार तरुण-तरुणीला ठोकरले. या अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील पोर्शे कार ही संबंधित बिल्डरने कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथून खरेदी केली आहे.

तेव्हा बंगळुरूमध्ये तात्पुरते सहा महिन्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. मात्र, पुण्यात कार आणल्यावर संबंधित बिल्डरने पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) रजिस्ट्रेशन केलेच नाही. त्यामुळे या बिल्डरकडे रजिस्ट्रेशनचे १७५८ रुपये नव्हते का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

पुणे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोर्शे कार खरेदी केल्यानंतर नियमानुसार पुणे आरटीओकडे सहा महिन्यांच्या आत रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. कार घेऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. बंगळुरूमधून कार खरेदी केल्यानंतर या कारची पुणे आरटीओकडे रजिस्ट्रेशन करण्यांची जबाबदारी ही संबंधित बिल्डरची आहे. मात्र, अद्याप पोर्शे कारचे रजिस्ट्रेशन केलेलेच नाही. काही दिवसांपूर्वी संबंधित बिल्डर कार घेऊन पुणे आरटीओ कार्यालयात आला होता. परंतु, त्याने रजिस्ट्रेशनसाठीची काणतीही कार्यवाही केली नाही. आम्ही त्यांना रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्रे आणि १७५८ रुपये शुल्क भरण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी पुढे कोणतीही कार्यवाही केली नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.