मुंबईतून पुण्याकडे येताना आरोपीचे पलायन; रेल्वेतून मारली थेट उडी
पुणे : खरा पंचनामा
मुंबईहून पुण्याला आणत असलेल्या आरोपीने पलायन केले आहे. देहू रोड परिसरामध्ये ही घडली आहे. विशाल हर्षद शर्मा असे या पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. रेल्वेतून थेट उडी मारुन आरोपी विशालने पळ काढला. यामुळे देहूरोड पोलिसांच्या हलर्गीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल हर्षद शर्मा हा येरवडा जेलमध्ये होता. विशालला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्याशी संबंधित खटला अद्याप कोर्टामध्ये चालू होता. त्यामुळे १३ मे रोजी गुरुग्राम येथील न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला नेण्यात आले होते. काल दि. 15 मे रोजी आरोपीला मुंबईहून रेल्वेने पुणे पोलीस त्याला घेऊन येत होते. मात्र विशालने चालत्या गाडीतून पळ काढला.
आरोपी विशाल शर्मा याने देहूरोड परिसरामध्ये चालत्या रेल्वेतून उडी मारली. त्याच्या हातामध्ये बेड्या असून बेड्यांसह आरोपीने रेल्वेतून पळ काढला. या संदर्भात काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.