Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; बावनकुळे, मुंडे, अजित पवारांना आयोगाची नोटीस

मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; बावनकुळे, मुंडे, अजित पवारांना आयोगाची नोटीस



मुंबई : खरा पंचनामा

काल लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, भाजपा आणि अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

मतदारांना प्रलोभन दाखवणारी विधाने प्रचारसभांमध्ये केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजप आणि अजित पवार गटाला नोटीस बजावली आहे. शरद पवार गटाचे अॅड. प्रांजल अगरवाल यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत.

बारामती तसेच इतर मतदारसंघांमध्ये भाषणे करताना मतदान केल्यास शासकीय तिजोरीतून सढळ हाताने निधी वितरित करण्यात येईल, अशा स्वरूपाचे विधान नेत्यांकडून करण्यात येत असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, असे राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

अजित पवार हे अनेकदा आपल्या भाषणामध्ये मतदारांना विविध आश्वासने देताना दिसत आहेत. त्याचबरोबर मतं द्या, निधी देतो. अशा आशयाची आश्वासनं दिली जात आहेत. मत दिल्यास शासकीय निधी दिला जाईल अशी आश्वासने वारंवार दिली जात असल्याचा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे.

निवडणूक आयोगाकडून राज्यातील काही पहिल्या फळीतील नेत्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. यामध्ये बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनाही नोटीस बजावली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.