Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर



मुंबई : खरा पंचनामा 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा देत कायम जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधात प्रदीप शर्मा यांनी दाद मागितली होती.

प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगिती मागणीवर शुक्रवारी सुनावणी झाली. शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्याची अट रद्द करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाच्या डबल बेंचने हे आदेश दिले आहेत.

प्रदीप शर्मांच्या संबंधिची प्रक्रिया सात दिवसात पूर्ण करा, असे आदेश मुंबई सत्र न्यायालयाला दिले आहेत. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्य पिठाने हा निर्णय दिला.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची लखनभैय्या हत्या प्रकरणात सेशन कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, उच्च न्यायालयानं हा निकाल फिरवून प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवलं होतं. त्या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने शर्मांना नियमित जामीन मंजूर केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.