अन ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचा अलार्म अचानक वाजला!
सांगली : खरा पंचनामा
सांगली लोकसभा निवडणूकीची ईव्हीएम मशीन्स आणि कागदपत्रे मिरजेतील शासकीय गोदामच्या स्ट्राँग रूमध्ये ठेवण्यात आली आहेत. त्याला अत्याधुनिक यंत्रणेसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. काल झालेल्या पावसाने पहाटे चार वाजता स्ट्राँग रूमचा अलार्म वाजला आणि प्रशासनाची धावपळ उडाली.
हा अलार्म वादळी पावसाच्या पाण्याचे थेंब गेल्यामुळे वाजत असल्याचे समोर आले. त्यानंतर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. ईव्हीएम व कागदपत्र ठेवलेल्या दोन्हीही स्ट्राँगरुम सुरक्षित असून या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँग रूम व निवडणूक कागदपत्रे ठेवलेली स्ट्राँग रुमला दोन ठिकाणी अग्नीशमन अलार्म यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. एक गोदामाच्या आतील बाजूस व दुसरी गोदामाच्या बाहेरील भिंतीवर ही यंत्रणा आहे. आज पहाटे चारच्या दरम्यान स्ट्राँग रूम बाहेरील भिंतीवरचा फायर अलार्म यंत्रणेमध्ये फॉल्स अलार्म वाजला. पावसाच्या पाण्याचे थेंब वाऱ्यामुळे गेल्याने फॉल्स अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आले होते. स्ट्राँग रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या अग्नीशमन कर्मचारी यांनी त्या ठिकाणी तत्काळ भेट देऊन पाहणी केली. अलार्म आगीमुळे नसून वादळी पावसाच्या पाण्याचे थेंब गेल्यामुळे वाजत होता म्हणून तो बंद करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.