सांगलीवाडीत बिबट्याचा खुलेआम वावर?
वनविभागाची गस्त; वारणा नदीकाठी दिसले पायाचे ठसे
सांगली : खरा पंचनामा
सांगलीवाडी परिसरात दोन दिवसापुर्वी बिबट्याचा वावर दिसून आला होता. वारणा नदी काठी विटभट्ट्यांजवळ असणाऱ्या शेतात त्याच्या पायाचे ठसे दिसले आहेत. त्यामुळे परिसरात घबराहटीचे वातावरण आहे. दरम्यान, ही माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने दाखल झाले. परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, बिबट्या दिसून आला नाही.
सांगलीवाडी परिसरात दोन दिवसापुर्वी बिबट्या आल्याचे काही जणांनी पाहिले. त्यानंतर विटभट्टीजवळ त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी त्याच्या पायाचे ठसे मिळून आले. ही बातमी समजताच तातडीने वनविभागासह प्राणीमित्रांनी धाव घेतली. रात्रभर परिसरात शोध घेतला मात्र बिबट्या सापडला नाही. अंधराचा फायदा घेत तो नदीकाठच्या शेतात निघून गेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वन विभागाकडून सांगलीवाडी परिसरात गस्त घालून बिबट्या शोध घेण्यात येत होता.
मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील म्हणाले,‘‘वारणा नदी काठच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत. त्यानुसार शोध घेण्यात आला. रात्री शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.