Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

CBI च्या अधिकाऱ्यालाच लावला 2 लाखांचा चुना!

CBI च्या अधिकाऱ्यालाच लावला 2 लाखांचा  चुना!



मुंबई : खरा पंचनामा

सध्याच्या काळात फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशातच आता मुंबईतील एका वरिष्ठ CBI अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. आपण दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असं सांगत आरोपीने या अधिकऱ्याला 2 लाख रुपयांना लुबाडले आहे. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेला अधिकारी BKC मधील CBI कार्यालयात काम करतो. 26 एप्रिल रोजी हा अधिकारी कामावर असताना त्याला अज्ञात क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपण दिल्ली गुन्हे शाखेचे उपसचिव असल्याचे सांगितले. तसेच CBI अधिकाऱ्याचा आधार क्रमांकही सांगितला, त्यामुळे हा कॉल खरा असल्याचे CBI अधिकाऱ्याची खात्री पटली.

आरोपी कॉलरने या अधिकाऱ्याला सांगितले की, '23 एप्रिल रोजी तुमच्या नावाने दिल्ली विमानतळावर एक पार्सल आले होते. हे पार्सल कंबोडियाचे होते आणि त्यात आठ पासपोर्ट, पाच क्रेडिट कार्ड, 170 ग्रॅम मेफेड्रोन आणि 45,000 रुपये रोख होते.' मात्र हे पार्सल आपले नसल्याचे CBI अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर या अधिकाऱ्याला DP मध्ये दिल्ली पोलिसांचा लोगो असलेल्या एका व्हॉट्सअॅप नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला आणि यावेळी दोघांमध्ये 50 मिनिटे बोलणं झाल.

आरापीने अधिकाऱ्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली. तसेच पोलीसांची कपडे घातलेल्या एका व्यक्तीने व्हिडिओ कॉल करुन ओळखपत्र आणि आधार कार्ड व्हेरिफाय करुन अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती दिली. यानंतर 28 एप्रिल रोजी आरोपीने या अधिकाऱ्याकडे 3.15 लाख रुपयांची मागणी केली. तसेच RBI च्या व्हेरिफिकेशननंतर पैसे परत केले जातील असे आश्वासन देण्यात आले.

CBI अधिकाऱ्याने 30 एप्रिलला आरोपीला 2 लाख रुपये पाठवले. त्यानंतर तोतया अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र संपर्क झाला नाही. त्यानंतर CBI अधिकाऱ्याने 4 मे रोजी आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांना ही घटना सांगितली तेव्हा त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले. या प्रकरणी अधिकाऱ्याने BKC पोलीसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.