राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीची धामधुम अद्यापही सुरु आहे. निकालामुळे एकीकडे नाराजी तर दुसरीकडे आनंदोत्सव साजरा होत आहे. दरम्यान, राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाबाबत घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या 27 जून रोजी पार पडणार आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 10 जून रोजी होणार होते. मात्र अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तारीखबाबत निर्णय घेण्यात आला असून अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. आता पावसाळी अधिवेशन हे येत्या 27 जून रोजी पार पडणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. यामध्ये चारा छावणी व पाणी टंचाई यावर देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी ताताडीने काही सूचना दिल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीबाबत अधिकची माहिती दिली. प्रशासन दुष्काळाकडे काळजीने आणि तातडीने लक्ष घालत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.